Posts

Showing posts from July, 2023

आईचा वारसा

मी जशी मोठी झाले तस मला नेहेमी वाटायचं की मी माझ्या बाबांची मुलगी आहे. खूप लोक सांगायचे की मी अगदी बाबांसारखी दिसते. अगदी दुसरा विनूच. आईचे केस कुरळे तर माझे सरळ. आई बोलायला रोखठोक. एकदम स्पष्टवक्ती. एक घाव दोन तुकडे. तर बाबा एकदम शांतपणे बोलणार. शक्यतो समोरची व्यक्ती दुखावली जाऊ नये असं बोलणार. आणि गरज असल्यास diplomatically बोलणार. मी गोड बोलून सगळी कामं करवून घेणारी. समोरच्या व्यक्तीचा बोलण्याचा रोख ओळखून वागणारी आणि बोलणारी. आई पटकन चिडणारी तर बाबा कमालीचे शांत. माझ्यावर रागावयाचे प्रसंग एकंदरीत कमीच यायचे. आई कमालीची शिस्तीची तर मी नीटनेटकी. आणि आई जरा अतीच करते या मताची. आई श्रद्धाळू, मनापासून पूजापाठ आणि उपासतापास करणारी तर आम्ही आपले बुद्धिवादी. मन चंगा तो कठौती में गंगा मानणारे. कर्मकांडाच्या अगदी विरुद्ध. आई म्हणजे सुगरण. २५-५० माणसांचा सहज स्वयंपाक करणारी तर मी स्वयंपाक शिकण्याची काय गरज आहे असा वाद घालणारी. आईला शिवण कामाची आणि भरतकामाची आवड तर मी धावदोरा आणि टीप घालता आली तर त्यातच धन्यता मानणारी. आई फार नि:स्वार्थीपणे सगळ्यांना मदत करणारी तर मी आपल्याच व्यापात गुरफटलेली...