Posts

दुबळी माझी झोळी...

प्रत्येकाच्या मनात आपल्या माणसांच्या साठी एक हळवा कोपरा असतो.  आपल्या माणसाच्या आठवणी आपल्या मनाच्या कुपी मध्ये कशा जतन करायच्या याची प्रत्येकाची एक पद्धत असते.  कुणी त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ वर्षभरासाठी सोडून देतात, कुणी त्यांचे फोटो लावतात,  कुणी त्यांचे दागिने किंवा त्यांच्या वापरातल्या इतर कोणत्या गोष्टी जपून ठेवतात, कुणी त्यांच्या नावे देणगी देतात, कुणी त्यांच्या आठवणी कागदावर उतरवतात. माझ्या मनात जेव्हा आईचा विचार येतो तेव्हा या सगळ्या गोष्टी फार तोकड्या वाटतात. आई जाताना एव्हढा मोठा वारसा मागे सोडून गेली आहे की त्याच जतन कसं करता येईल हा विचार मनात डोकावतो. "घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे" हाच एक मार्ग दिसतो. जर हा वारसा जपायचा असेल तर आपल्या मनाला भावतील आणि आपल्याला शक्य होतील त्या गोष्टी आपल्या अंगी बाणवायला हव्या.   आई फार श्रद्धाळू होती. रोज दारात शुभ चिन्हांनी युक्त रांगोळी असायची. दारात चपलांचा स्टँड आल्यानंतर तिने देवघरासमोर काळ्या ग्रॅनाईटवर रांगोळी काढायची. रोज संध्याकाळी देवासमोर दिवा न चुकता लावायची. व्रत वैकल्यांवर तिचा विश्व...

दरवळ

Image
परवा मी रिक्षाने बाहेर जात असताना सिग्नल जवळ अचानक परिचित सुगंध जाणवला. एप्रिल महिना चालू झाला की मोगरा अणि मोगऱ्याच्या फुलांचे गजरे यायला सुरुवात होते.  मोगरा म्हटला की आईचीच आठवण येते.  आईला मोगरा फार आवडायचा.  पूर्वी एप्रिल महिना सुरू झाला की रोज दारावर मोगऱ्याची फुलं विकायला यायची.  आई रोज पाव किलो फुलं विकत घ्यायची. फुलांपेक्षा कळ्याच असायच्या.  आई कळ्या उमलतील याची परत परत विचारून खातरजमा करुन घेऊन मगच फुलं घ्यायची. ती फुलं ओवून गजरे तयार करणे रोजचा उद्योग असायचा.  ते गजरे मग ओल्या कापडात गुंडाळून ठेवायचे. सकाळपर्यंत गजरे छान उमलायचे. कुठेही जाताना हमखास गजरा माळून मगच बाहेर पडायची.  बाहेर नाही गेलं तर घरात गजरा माळून बसायची. दिवसभर मोगऱ्याचा सुगंध दरवळत रहायचा. कुणाच्याही घरी काही कार्य असलं की गजरे आणण्याची जबाबदारी हमखास तिच्याकडे असायची.  आईला एकंदरीत झाडांची खूप हौस होती.  झाडांची म्हणण्यापेक्षा फुलझाडांची हौस होती असं म्हणायला हरकत नाही. आमच्या छोट्याश्या गच्ची मध्ये विविध फुलझाडांची रेलचेल होती. आमच्याकडे देशी गुलाब ह...

आईचा वारसा

मी जशी मोठी झाले तस मला नेहेमी वाटायचं की मी माझ्या बाबांची मुलगी आहे. खूप लोक सांगायचे की मी अगदी बाबांसारखी दिसते. अगदी दुसरा विनूच. आईचे केस कुरळे तर माझे सरळ. आई बोलायला रोखठोक. एकदम स्पष्टवक्ती. एक घाव दोन तुकडे. तर बाबा एकदम शांतपणे बोलणार. शक्यतो समोरची व्यक्ती दुखावली जाऊ नये असं बोलणार. आणि गरज असल्यास diplomatically बोलणार. मी गोड बोलून सगळी कामं करवून घेणारी. समोरच्या व्यक्तीचा बोलण्याचा रोख ओळखून वागणारी आणि बोलणारी. आई पटकन चिडणारी तर बाबा कमालीचे शांत. माझ्यावर रागावयाचे प्रसंग एकंदरीत कमीच यायचे. आई कमालीची शिस्तीची तर मी नीटनेटकी. आणि आई जरा अतीच करते या मताची. आई श्रद्धाळू, मनापासून पूजापाठ आणि उपासतापास करणारी तर आम्ही आपले बुद्धिवादी. मन चंगा तो कठौती में गंगा मानणारे. कर्मकांडाच्या अगदी विरुद्ध. आई म्हणजे सुगरण. २५-५० माणसांचा सहज स्वयंपाक करणारी तर मी स्वयंपाक शिकण्याची काय गरज आहे असा वाद घालणारी. आईला शिवण कामाची आणि भरतकामाची आवड तर मी धावदोरा आणि टीप घालता आली तर त्यातच धन्यता मानणारी. आई फार नि:स्वार्थीपणे सगळ्यांना मदत करणारी तर मी आपल्याच व्यापात गुरफटलेली...